स्टार माझाच्या कुटुंबामध्ये सामील होण्याची इच्छा तुमच्या मनात डोकावत असेल तर असे समजा की एक सुवर्णसंधी जणू तुमची वाटच पाहतीय. कारण आम्हीही अशाच उत्साही, कल्पक आणि कष्टाळू तरुण-तरुणींच्या शोधात आहोत, जे स्टारचे सरताज होतील. आपल्या गुणांनी मराठी पत्रकारितेला उजळून टाकतील. तुमचा विचार पक्का असेल आणि या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची तुम्हाला खरोखरच इच्छा असेल तर आपला बायोडेटा careers@starmajha.com या पत्त्यावर ई मेल करा.